Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रभाग क्रमांक २१ मध्ये भव्य प्रचार प्रारंभ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी गाव, वैभवनगर, मिलिंदनगर, जिजामाता रुग्णालय, अशोक थिएटर परिसर आदी भागांचा समावेश असलेल्या या प्रभागात भाजपाचा प्रचार जोमात सुरू होणार असून, “विजयाचा संकल्प” घेऊन ही रॅली काढण्यात येणार आहे.

ही प्रचार रॅली गुरुवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आली असून, रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक चौक, पिंपरीगाव येथून होणार आहे. ही रॅली मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल परिसर, अशोक थिएटर परिसर अशा विविध ठिकाणांहून मार्गक्रमण करण्यात येणार आहे.

लोकशाहीच्या बळावर आणि विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत भाजपाचा प्रचार अधिक गतिमान करण्याचा निर्धार या रॅलीतून व्यक्त केला जाणार आहे. या ऐतिहासिक प्रचार प्रारंभ रॅलीसाठी सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाच्या वतीने करण्यात आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version