Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील उमेदवार  विनोद जयवंत नढे यांच्या प्रचाराला आज जोरदार सुरुवात झाली. ज्योतिबा नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी कॉलनी, ज्योतिबा कॉलनी, अभियंता कॉलनी, अविनाश मंगल कार्यालय परिसर तसेच काळेवाडी गावठाण या भागात भव्य प्रचार यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रचार यात्रेदरम्यान उमेदवार विनोद नढे यांचे नागरिकांनी ठिकठिकाणी फटाके वाजवून जल्लोषात स्वागत केले. महिलांनी औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या, तर नागरिकांनी पुष्पहार अर्पण करून आपला पाठिंबा व्यक्त केला. प्रचार यात्रेमुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या यात्रेमध्ये तरुणांचा सहभाग विशेष लक्षणीय ठरला. युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. यासोबतच वडीलधारी, वयोवृद्ध नागरिक आणि महिलांचीही उल्लेखनीय उपस्थिती पाहायला मिळाली. विविध वयोगटातील नागरिकांनी उमेदवाराशी संवाद साधत स्थानिक प्रश्न, विकासकामे आणि भविष्यातील अपेक्षा याबाबत चर्चा केली.

प्रचारादरम्यान  विनोद नढे यांनी नागरिकांशी थेट संवाद साधत प्रभागातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, युवकांसाठी संधी आणि महिलांच्या प्रश्नांवर भर देण्याचे आश्वासन दिले. “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणे हेच माझे प्रमुख उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी यावेळी सांगितले.
या भव्य प्रचार यात्रेमुळे प्रभाग क्रमांक २२ मध्ये निवडणूक वातावरण तापले असून, येणाऱ्या दिवसांत प्रचाराला आणखी गती मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version