Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात इच्छुक उमेदवारांकडून मिळालेल्या अर्जवितरण प्रक्रियेला चौथ्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत एकूण 179 इच्छुक उमेदवारांनी घेतले शिवसेनेचे अर्ज

मावळचे महासंसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महानगरप्रमुख राजेश वाबळे यांच्या उपस्थित अर्जवितरणाची प्रक्रिया पार पडली. 9 डिसेंबरला पहिल्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण 47 अर्ज वाटप करण्यात आले. 10 डिसेंबरला दुसऱ्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण – 62 अर्ज वाटप करण्यात आले.11 डिसेंबरला तिसऱ्या दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण – 39 अर्ज वाटप करण्यात आले. 12 डिसेंबरला चौथा दिवशी ऑनलाइन व ऑफलाइन मिळून एकूण – 31 अर्ज वाटप करण्यात आले.

अशाप्रकारे चार दिवसांत आजपर्यंत एकूण 179 अर्ज वितरित झाले असून उमेदवारीसाठी शिवसैनिकांचा मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून आला.

अर्जवितरण नियोजनात  श्वेता कापसे, तेजश्री ढोरे-पाटील तसेच शिवसेना सोशल मीडिया टीमचे विशेष योगदान राहिले.पक्ष संघटनेची निवडणूकपूर्व तयारी आणि वाढता उत्साह यामुळे आगामी राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे.

श्री राजेश वाबळे
शिवसेना महानगरप्रमुख
( पिंपरी चिंचवड शहर )

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version