Spread the love

 

पिंपळे गुरव ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  सिरम इन्स्टिट्यूट, पुणे येथे कार्यरत असलेले व्यवस्थापक सुनिल दिलीप शेवाळे (काशीद पार्क, पिंपळे गुरव) यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे अंतर्गत औषध निर्माण शास्त्रामध्ये पी एच डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी डी पी यु युनीटेक सोसायटी चे डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मा स्युटिकल्स सायन्सेस अँड रिसर्च, पिंपरी पुणे येथुन डॉ वैशाली उंडाळे यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘स्टडी ऑफ प्रोटेक्टिव्ह इफेक्ट ऑफ हर्बल कंपोसाईट्स फॉल्लोविंग अकॅसिडेंटल इंजुईरीज इन एक्सपरिमेंटल अनिमल्स ‘ या विषयावर आपला शोध प्रबंधक सादर केला.

या संशोधन कार्यात डॉ. सुनिल शेवाळे यांचे डी वाय पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. सोहन चितलांगे , वृषाली भालचिम , विकास वावळे तसेच सिरम इन्स्टिट्यूटचे डॉ. हित शर्मा , डॉ. समीर पारेख , डॉ. प्रमोद पुजारी , डॉ शिवानी देसाई यांचे मोलाचे योगदान लाभले. त्यांच्या या यशामध्ये त्यांची पत्नी सौ सोनाली शेवाळे- गायकवाड, आई सौ. मालती वडील दिलीप यांनी अपार कष्ट घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version