पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक ६ मधील सक्रिय आणि तरुण नेतृत्व म्हणून ओळख असलेले सुमित सतिश ‘आण्णा’ लांडगे यांची भाजपा युवा मोर्चा धावडे वस्ती, इंद्रायणी नगर, नेहरुनगर मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली. स्थानिक पातळीवरील पक्ष संघटन बळकटीसाठी झालेल्या युवक बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला.
युवा कार्यकर्त्यांमध्ये सातत्याने संपर्क, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग आणि संघटनेच्या वाढीसाठी केलेल्या कामाचा सकारात्मक परिणाम म्हणून लांडगे यांच्या नावावर एकमुखी मतप्रमाण दिसून आले. त्यांच्या निवडीचे स्थानिक तरुण कार्यकर्त्यांसह नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
नव्या नियुक्तीनंतर प्रतिक्रिया देताना सुमित लांडगे म्हणाले की, “पक्षाच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. प्रभागातील युवकांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे आवाज उठवणे आणि संघटन वाढवणे हेच माझे प्राधान्य असेल.”
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग ६ मध्ये पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. तरुण नेतृत्वाला संधी देत भाजपा युवा मोर्चाने नव्या उर्जेसह संघटन विस्ताराला गती देण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
