Spread the love

 

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक संस्था व्दारा संचलित प्रिझम इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ह्या प्रसंगी प्रिझम स्कूलमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती. च-होली गांवचे कर्नल सुभाष मारुती तापकीर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी होते. त्यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ह्या प्रसंगी तात्यासाहेब तापकीर पाटील, उल्हासराव काटे (लोकल बोर्डाचे सदस्य), रामदास दादा काळजे, गुलाबराव ताजणे, अॅड कुणाल तापकीर, अनिल तापकीर, सुनिल पठारे, सोनावणे, सिराजभाई मुलाणी (मुस्लिम समाज अध्यक्ष), पोपट घारे, ह.भ.प.भानुदास तापकीर, ह.भ.प.डफळ महाराज, माजी ग्रामसदस्या अलकाताई पठारे, सौ. काटे सह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

सर्व प्रथम कर्नल सुभाष मारुती तापकीर ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, प्रिझम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांतुन सामाजिक ऐक्य, राष्ट्रीय एकात्मताचे प्रदर्शन करून उपस्थितांची वाहवा मिळविली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर, लेझीम, कराटे, योगासनांची प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. योगशिक्षिकांनी ध्यान धारणा, योगा व्दारे आपले आरोग्य व मानसिकता कशी स्थिर ठेवता येते ते प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून पटून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेच्या संस्थापिका सुरैय्या शेख ह्यांनी केले. सुत्रसंचंलन महमंदशरीफ मुलाणी केले; आभार प्रदर्शन सिराजभाई मुलाणी केले. कार्यक्रमाचे संयोजक सिकंदर शेख व प्रिझम स्कूलचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version