Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी चिंचवड सायन्स पार्क आणि जलदिंडी प्रतिष्ठान यांच्या संकल्पनेतून तसेच विलो मॅथर आणि प्लाट यांच्या अर्थसाहाय्याने ‘माझी नदी – माझी जबाबदारी’ या संकल्पनेवर आधारित नदी विषयक दालन (River Gallery) साकारण्यात आले आहे. या दालनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे सोमवार, दिनांक ०८ डिसेंबर २०२५ रोजी स. १०.३० वा. करण्यात येत आहे.

या दालनात अप्पर भीमा बेसिनची माहिती, प्रमुख नद्या, पुणे जिल्ह्यातील प्रमुख धरणे, पवना नदीचे त्रिमितीय (3D) मॉडेल, पवना नदीचा इतिहास व भूगोल, पाण्याच्या गुणवत्तेचे मापदंड, जलशुद्धीकरण व सांडपाणी प्रक्रिया तंत्रज्ञान या विविध बाबींचे माहितीचे दालन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, नागरिकांनी नदी प्रदूषण रोखण्यासाठी व कमी करण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजना आणि जबाबदाऱ्या याबाबतही मार्गदर्शक व प्रदर्शनीय माहिती या दालनात देण्यात आली आहे. पवना धरणापासून दापोडी पर्यंतच्या संपूर्ण नदीपात्राची प्रतिकृती या दालनातून पहायला मिळणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version