Spread the love

 

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेची यमुनानगर, निगडी येथील शाळा यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्त आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. उद्योजक अनिल भांगाडिया, लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य हिरामण गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार,छत्री कवायत, फुलांची कवायत, लेझीमचे प्रात्यक्षिक सादर केले. भारतीय संविधान यावर विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. राष्ट्र भक्तीपर गीत सादर केले. शाळा समिती अध्यक्ष दामोदर भंडारी यांनी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थी मानसी गवंडगावे, शिक्षिका जयश्री कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अश्विनी रासकर यांनी केले. मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, मुख्याध्यापक रविंद्र मुंगसे, सविता बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम सादर करण्यात आला.

Share.
Leave A Reply

Exit mobile version