Spread the love

 

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाच्या वतीने आज गुरुवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ठीक ०३:०० वाजता ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे यशवंत – वेणू गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभहस्ते आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार्‍या या गौरव सोहळ्यात ज्येष्ठ समाजसुधारक गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनीताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे हे गौरव सोहळ्याचे स्वागताध्यक्ष आहेत.

गौरव सोहळ्यात लातूर येथील माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभा पाटील कव्हेकर या दांपत्याला यशवंत – वेणू सन्मान प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर सिद्धिविनायक इंडस्ट्रीजचे संचालक विशाल पलांडे (यशवंतराव चव्हाण युवा उद्योजक पुरस्कार), ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे (यशवंतराव चव्हाण सह्याद्री भला माणूस पुरस्कार) यांना प्रदान करून सन्मानित करण्यात येईल. याप्रसंगी श्रमश्री बाजीराव सातपुते यांचे ‘यशवंतराव इतिहासाचं एक सोनेरी पान’ या विषयावर व्याख्यान होईल. या सोहळ्याचा सर्व नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, पिंपरी-चिंचवड विभागाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version