नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत आदर्श नगर परिसरातील वाढत्या डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी युवासेना, शिवसेनेचे मेघराज लोखंडे मावळ लोकसभा जिल्हा उपाध्यक्ष यांनी पुढाकार घेत प्रभावी कारवाई केली.
डेंग्यू, झिका, चिकुनगुनिया व मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती मिळताच लोखंडे यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून फवारणीची तातडीने व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर केवळ आदेश देण्यावर न थांबता त्यांनी स्वतः मशीन हातात घेऊन परिसरात फवारणीचे काम करून आदर्श कार्यपद्धती दाखवली.
नागरिकांच्या आरोग्यासोबत कोणतीही तडजोड न करता वेगवान व परिणामकारक कारवाई करण्यात आली. फवारणीमुळे परिसरातील डासोत्पत्ती रोखण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांमध्ये समाधान व आनंदाचे वातावरण पसरले आहे.
याप्रसंगी नागरिकांनी मेघराज लोखंडे यांच्या तत्परतेचे आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले.यावेळी आरती भेगडे,संभाजी भेगडे,अमन हिवाळे आदी शिवसैनिक उपस्थित होते.
