Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपाच्या संत तुकाराम नगर–कासारवाडी–खराळवाडी मंडळाच्या एस.सी. मोर्चा अध्यक्षपदी निलेश राजू आढाव यांची निवड करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्ष संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे.
मंडळातील विविध बैठकीत व संवाद उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग, सामाजिक कार्यातील सातत्य आणि समाजातील मागासवर्गीय घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत ही निवड करण्यात आल्याचे कळते. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाने दिलेल्या शिफारशीवर ही नियुक्ती अधिकृत करण्यात आली.
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना निलेश आढाव म्हणाले, “एस.सी. मोर्चा म्हणून समाजातील समस्यांवर प्रभावी आवाज उठवणे, तरुणांना संघटनाशी जोडणे आणि मंडळात BJP च्या विकासाभिमुख धोरणांची प्रभावी अंमलबजावणी हा आमचा प्राधान्यक्रम असेल.”
त्यांनी पुढे सांगितले की सामाजिक उपक्रम, मार्गदर्शन शिबिरे, महिला व तरुणांसाठी जनजागरण मोहिमा राबवून मोर्चाचे संघटन अधिक मजबूत केले जाईल.
या निवडीबद्दल स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आढाव यांचे अभिनंदन केले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
पक्षाच्या पुढील धोरणांमध्ये एस.सी. मोर्चाचा सहभाग वाढवण्याबाबतही मंडळात सकारात्मक चर्चा सुरु आहेत.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version