Spread the love

 

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला पुन्हा काबिज करण्याकरिता व तो अधिकाधिक मजबूत रहावा या दृष्टीकोनातून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राज्यात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणकांच्या दृष्टीने जिल्हा समन्वय व नियोजन करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पिंपरी चिंचवड शहराकरिता  आमदार  विलास लांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच माजी सभापती, शिक्षण मंडळ  विजय लोखंडे यांची पिंपरी–चिंचवड शहर कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे.

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका 2025-2026 निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अतिशय महत्त्वपूर्ण जबाबदारीसाठी  अजित पवार  व  सुनील तटकरे यांचे व पक्षाचे विचार समाजातील तळागाळापर्यंत पोहचविण्याचे यशस्वी प्रयत्न करतील असे नियुक्तीची माहिती देताना शहराध्यक्ष योगेश बहल यांनी विश्वास व्यक्त केला आहे तसेच यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version