Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महा पालिकेच्या  उद्यान विभागाने चार वर्षांपूर्वी तत्कालीन अधीक्षक गोरखनाथ गोसावी यांच्या माध्यमातून लांडेवाडी ते शांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एस ब्लॉकमध्ये रस्त्याच्या कडेला झाडे लावली आहेत ,सात ते आठ फूट झाडे उंच गेल्यावर पाण्याअभावी जळाली आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे जळाली असून खड्डे रिकामे झालेली आहेत .एका बाजूला पालिका पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी हजारो झाडे लावण्याचा दिखावा करते, दुसऱ्या बाजूला पालिकेचाच उद्यान विभागाला झाडांना पाणी घालण्यासाठी वेळ नाही का?

रस्त्याच्या डिव्हाडर मधील शोभेची झाडे मरण यातना भोगत आहे, उद्यान विभागाचे अधिक्षक वसावे याकडे जातीने लक्ष देतील का? असा उदिग्नप्रश्न अण्णा जोगदंड यांनी केला आहे.

शहरातील नागरिकांना जर आपल्या प्रांगणातील अडथळा ठरत असलेले झाड तोडायचे असेल तर उद्यान विभाग अनेक अटी घालत असते पर्यायी झाड लावण्याचा आग्रह ही धरते आणि त्या अटी पूर्ण केल्यानंतरच झाड तोडण्याची परवानगी देते, मग उद्यान विभागाची संबंधित कर्मचारी पाणी न दिल्यामुळे झाड जळते याला जबाबदार कोण ? हाच नियम अधिकाऱ्यांना का लागू होत नाही ,कर्तव्यात कसूर केल्यामुळे संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्यांच्या वर पण सर्वसामान्य नागरीकाप्रमाणे कार्यवाही करण्याचे धाडस उद्यान अधिक्षक वसावे साहेब, पालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे,उद्यान उपायुक्त रविकिरण घोडके दाखवतील काय ? असा जळजळीत प्रश्न निवेदन देतांना मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी केली आहे.

निवेदनावर शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, महीला शहराध्यक्षा मीना करंजावणे,कार्याध्यक्ष मुरलीधर दळवी, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा.संगिता जोगदंड आळंदी सचिव रवी भेंकी,सचिव गजानन धाराशिवकर, अँड सचिन काळे, राहुल शेंडगे, पंडित वनसकर,वैभव काळे यांच्या सहया आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version