Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आज विद्यार्थी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शाळेचे संस्थापक श्री. अरुण चाबुकस्वार सर, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत , तसेच पालक प्रतिनिधी निर्मला सावंत, प्रियंका गायकवाड आणि जासू सुतार यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या आकर्षक नृत्य सादरीकरणाने झाली. इयत्ता सहावी व तिसरीच्या मुला-मुलींनी सुंदर डान्स परफॉर्मन्स करून सर्वांचे मन जिंकले.

विद्यार्थ्यांसाठी विशेष मनोरंजनात्मक खेळांचीही व्यवस्था करण्यात आली. अनिता रोडे व  उर्मिला ठोबरे यांनी विविध खेळांचे आयोजन करून मुलांचा उत्साह अधिकच वाढवला.

विद्यार्थी दिनाचा कार्यक्रम मुलांच्या हास्य-विनोदाने आणि आनंदाने यशस्वीपणे पार पडला.

सूत्रसंचालनाची जबाबदारी पूजा देवगिरी यांनी उत्तमरित्या पार पाडली,तसेच आजचा कार्यक्रमाचे इंग्रजी भाषण सारिका मॅडम, हिंदी भाषण  गीतांजली मॅडम, मराठी भाषण कल्पना चौधरी ह्यांनी सुंदर रित्या सादर केले . तर आभार प्रदर्शन चेतना देशमुख यांनी केले.      

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version