Spread the love

काँग्रेस व मातंग एकता आंदोलनतर्फे कार्यक्रम उत्साहात

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड स्टेशन येथे क्रांतिकारक क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (अनुसूचित जाती विभाग) आणि मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र संघटना यांच्या वतीने अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमात लहुजी वस्ताद साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच त्यांचे शिष्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या वेळी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व नेतृत्त्व मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष हिरामण खवळे, वरिष्ठ उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे, ॲड. अनिरुद्ध कांबळे, हर्षद ओव्हाळ, रवी ससाने, विशाल कसबे, युवक काँग्रेसचे प्रवक्ते, शितल कोतवाल, राधिका अडागळे, पांडुरंग पाटोळे, सागर तुपे, चंद्रकांत साखळे, अण्णा कसबे, मिलिंद फरतडे, वसंत वावरे, सचिन दुबळे, नवनाथ शेलार, कैलास पाटोळे, सौरभ शेलार, गोरक्ष शेलार, नामदेव रीठे यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यानंतर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त शाहिरी गाण्यांचा जलसा पार पडला. शाहिर बापू पवार यांनी क्रांतिकारी, अन्यायाविरुद्ध चेतना जागवणारे प्रेरणादायी शाहिरी गायन सादर करून उपस्थितांमध्ये स्फूर्ती निर्माण केली. त्यांनी शहरातील मान्यवर नेत्यांची नावे उच्चारत स्वागतही केले.

या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवडचे युवा नेते, विधानपरिषद आमदार मा. अमितजी गोरखे यांच्यासह मनोज तोरडमल, भाऊसाहेब अडागळे, युवराज दाखले आणि इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमामुळे परिसरात सामाजिक ऐक्य, प्रेरणा आणि क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या लढाऊ विचारांचा जागर रंगला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version