Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहराच्या क्रीडा इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावरील “आयएफएससी एशियन किड्स चॅम्पियनशिप २०२५” या पर्वतारोहण स्पर्धेचे आयोजन होत आहे. भारतीय पर्वतारोहण संस्थान, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि महाराष्ट्र स्पोर्ट क्लाईंबिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १ ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पिंपळे सौदागर येथील योगा पार्कमध्ये ही भव्य स्पर्धा पार पडणार आहे.

या स्पर्धेत आशिया खंडातील तब्बल १३ देशांतील २०० स्पर्धक सहभागी होणार असून, पिंपरी-चिंचवड शहराचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडा नकाशावर झळकणार आहे.

या चॅम्पियनशिपचे उद्घाटन चिंचवड विधानसभेचे आमदार श्री. शंकरशेठ जगताप यांच्या शुभहस्ते १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

🌟 शहरातील पहिली क्लाईंबिंग वॉल – शत्रुघ्न (बापू) काटे यांची संकल्पना प्रत्यक्षात
पर्वतारोहण आणि क्लाईंबिंग सारख्या जागतिक दर्जाच्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांनी ‘क्लाईंबिंग वॉल’ या अभिनव संकल्पनेचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे ही संकल्पना प्रत्यक्षात आली असून, पिंपळे सौदागर येथील योगा पार्क आता शहरातील नागरिकांसाठी एक नवे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स सेंटर बनले आहे.

शत्रुघ्न (बापू) काटे म्हणाले, “पर्वतारोहण हा केवळ खेळ नाही, तर शिस्त, आत्मविश्वास आणि शारीरिक क्षमतेचे प्रतीक आहे. आपल्या शहरातील तरुणाईला जागतिक दर्जाचे प्रशिक्षण आणि अनुभव मिळावा, या उद्देशाने आम्ही ही संकल्पना राबवली. १३ देशांतील २०० स्पर्धक आपल्या शहरात येत आहेत, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेमुळे पिंपरी-चिंचवड शहराचा क्रीडा विकासाचा नवा पर्व सुरू होणार असून, तरुणाईला नव्या संधींचे द्वार खुले होईल.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version