Spread the love

 

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी रंगभूमी दिनानिमित्त शहरातील विवाहित महिलांसाठी एक आगळावेगळा सांस्कृतिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखा, कशिश प्रॉडक्शन्स आणि कशिश सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “शौर्यवती” या नावाने खास सांस्कृतिक फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाचा उद्देश मराठी भाषेचा अभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि शौर्यवंत मराठी स्त्रीची ओळख समाजासमोर प्रभावीपणे मांडणे असा आहे. संस्थेचे अध्यक्ष मा. श्री भाऊसाहेब भोईर यांच्या मते, “सांस्कृतिक फॅशन शोच्या माध्यमातून महिलांना आत्मविश्वास आणि मराठी संस्कृती सादर करण्याची संधी मिळेल.”

हा शो फक्त विवाहित महिलांसाठी असून दोन वयोगटांत स्पर्धा होणार आहे – ४० वर्षांखालील आणि ४१ वर्षांवरील. प्रत्येक गटातून २५ फायनलिस्ट निवडले जातील, त्यापैकी टॉप ३ विजेत्यांना विशेष पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेत दोन प्रमुख राऊंड असतील – “शौर्यवीर मराठी महिलांच्या परिधानांवर आधारित परिचय राऊंड” आणि “वॉक राऊंड.”

या फॅशन शोचे ग्रुमर व कोरिओग्राफर म्हणून “पुण्याचे पॅडमॅन” म्हणून ओळखले जाणारे श्री. योगेश पवार तर शो डायरेक्टर्स म्हणून प्रसिद्ध मॉडेल मानसी भोसले आणि श्री. पवार कार्यभार सांभाळणार आहेत.

महत्त्वाच्या तारखा:

ऑडिशन – ३ नोव्हेंबर २०२५

ट्रेनिंग – ६ नोव्हेंबर २०२५

भव्य फिनाले – ७ नोव्हेंबर २०२५

या उपक्रमाद्वारे मराठी स्त्रीचे शौर्य, सौंदर्य, आत्मविश्वास आणि संस्कृतीची झलक प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.

संपर्क: मानसी भोसले – ७३५०६०४७५२, कविता – ८२६३८९५५९

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version