Spread the love

 

आमदार शंकर जगताप यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग) – अखेर वाकड ते मामुर्डी दरम्यानच्या सेवा रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली आहे. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या होर्डिंग्ज काढण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असून, नागरिकांना लवकरच वाहतूक कोंडीच्या त्रासातून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी काही दिवसांपूर्वी या परिसरात पाहणी दौरा करत संबंधित अधिकाऱ्यांना काम तातडीने सुरू करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. त्यांच्या निर्देशानंतरच आज प्रत्यक्ष कामाला गती मिळाली आहे.

कामाची सुरुवात होताच ठिकठिकाणी डांबरीकरण, अतिक्रमण हटविणे, सर्विस लाईन शिफ्ट करणे आणि वाहतूक मार्ग मोकळा करणे अशी कामे हाती घेण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC), वाहतूक विभाग, आणि महावितरण या सर्व यंत्रणांचा यात समन्वय राखला जात आहे.

आमदार जगताप यांनी स्पष्ट केले की, “या भागातील नागरिकांना गेल्या वर्षभरापासून वाहतूक कोंडीचा मोठा त्रास होत आहे. त्यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून सर्व्हिस रोडची कामे हाती घेतली असून ती नियोजित वेळेत पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

दरम्यान, भुजबळ चौक ते भूमकर चौकापर्यंतचे काम मोठ्या प्रमाणात पूर्ण झाले असून, आता उर्वरित सेवा रस्त्यांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.

या ठिकाणी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या होर्डिंग्ज, झाडे, कंटेनर आणि अतिक्रमणे हटविण्याचे कामही सुरू आहे. काम पूर्ण झाल्यानंतर या परिसरातील वाहनचालकांना सुरळीत आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version