Spread the love
काळेवाडी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काळेवाडी विभागाच्या वतीने गणेश विसर्जनाच्या दिवशी एक सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. काळेवाडी विसर्जन घाट आणि ज्योतिबा गार्डन येथील गणेश मूर्ती संकलन केंद्रांवर काम करणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यामध्ये आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, अग्निशामक दल, विद्युत विभाग, सफाई कर्मचारी तसेच पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांसाठी चहापाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली होती, ही सामाजिक बांधिलकी जपत करण्यात आलेली स्तुत्य गोष्ट होती.
सन्मानित करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी:
डॉ. रीचा नवघणे (आरोग्य अधिकारी), संजय गायकवाड, विनोद जाधव, दिनेश जांभळे, विजय राठोड, मुख्य अभियंता देशमुख (विद्युत विभाग), मेश्राम मॅडम, प्रकाश तंबोरे, अनिल सोनवणे, नितीन सूर्यवंशी, विशाल माने, एल. एल. जमादार साहेब, धारणे साहेब (पोलीस हवालदार), दीपक धोत्रे, सचिन दगडे, निलेश कांबळे, मयूर देवरे, गजानन चव्हाण, संजय ऐकाळे, अमोल कांबळे, कीर्तिराज सोनकांबळे (अग्निशामक दल) आदींना सन्मानित करण्यात आले.
यावेळीछावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष  धनाजी येळकर, कोळी महासंघाचे अध्यक्ष डी. एम. कोळी, प्रहार संघटनेचे संजय गायके, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ मंजाळ, चंद्रकांत गायकवाड, एकनाथ काटे, राजेंद्र भरणे, भरत शिंदे, कृष्णा येळवे, बाळासाहेब येडे, दीपक भगत, लक्ष्मण टोणपे, प्रजाक नढे, सिताराम जगताप, मिलिंद कोंढरे, सोनवणे मामा, शारदा चोक्सी, श्रीमती जठार आदी उपस्थित होते. तर कार्यक्रमाचे आयोजक म्हणून चिंचवड विधानसभा प्रमुख हरेश आबा नखाते व सुजाता नखाते यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन:
विभाग प्रमुख गोरख पाटील यांनी केले.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version