Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमधील पहिला मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उन्न‘ती’ चा गणेशोत्सवाच्या औचित्याने ढोल-ताशा व लेझीम पथकांचा भव्य गौरव समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश महापूजा व महाप्रसादाने झाली. त्यानंतर पिंपळे सौदागर येथील शिवसंघर्ष ढोल ताशा पथकाने स्थिर वादन सादर करून भारतीय वाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवले.

पथकातील सर्व वाद्यवृंदाचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्याचप्रमाणे पीस व्हॅली , पी. के. इंटरनॅशनल स्कूल, द्वारका साई वंडर फेज-2, रोज लँड (गेट नं. 4), वेरेंज सोसायटी, साई पर्ल सोसायटी, ट्रायोस सोसायटी आणि पाम ब्रिज सोसायटी या विविध रहिवासी सोसायटीतील ढोल-ताशा पथकांना सन्मानित करण्यात आले.

छोटू मराठी मालिकेतील बालकलाकार अथर्व सिंघल, नित्या गुप्ता व समिहा दशरथ यांनी बहारदार गाणे सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ तसेच आपला आवाज प्रतिनिधी संगीता तरडे उपस्थित होत्या.

या वेळी उन्न‘ती’ सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “ढोल-ताशा व लेझीम पथकांच्या माध्यमातून आपली वाद्यसंस्कृती जिवंत राहते आणि तरुण पिढीत उत्साह निर्माण होतो. पथकांच्या सन्मानाने त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक सलोखाही वृद्धिंगत होतो.”

प्रमुख पाहुण्या सुप्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी गौरव समारंभाचे कौतुक करताना म्हटले की, “ढोल-ताशा ही आपल्या भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या वाद्यसंस्कृतीतून एकतेची भावना, शिस्त आणि सामूहिक कार्य करण्याची प्रेरणा मिळते. अशा उपक्रमांमुळे तरुणांना व्यासपीठ मिळते, त्यांचा सर्वांगीण विकास होतो आणि सामाजिक बांधिलकी दृढ होते. उन्नती सोशल फाऊंडेशनचे असे उपक्रम खरोखरच प्रेरणादायी आणि कौतुकास्पद आहेत.”

याप्रसंगी उन्नती सोशल फाउंडेशन चे संस्थापक  संजय तात्याबा भिसे , पि के स्कुल चे संस्थापक जग्गनाथ काटे,ऑस्टिन ग्रुपचे राजू भिसे , अतुल पाटील , गुलाब मेटे, एकनाथ वाळके, सतिष काटे आनंद हास्य क्लबच्या अध्यक्षा मीनाक्षी देवतारे , राजेंद्रनाथ जयस्वाल , उन्नती सखी मंचच्या उपाध्यक्षा डॉ.रश्मी मोरे , योगिता नाशिकर,दिपाली देशमुख, रोहिणी ढोरे, मनिषा पाटीलयांच्यासह विठाई वाचनालय चे सभासद , आनंद हास्य क्लब चे सभासद , ऑल सिनियर सिटीजन्स असोसिएशन चे सर्व सभासद तरुण वर्ग आणि पिंपळे सौदागर परिसरातील नागरिक बंधू-भगिनी, गणेश भक्त आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version