Spread the love

अयोध्या, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाली. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज भगवान श्रीराम त्यांच्या भव्यदिव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. देशभरात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. या सोहळ्यानंतर नरेंद्र मोदींनी उपस्थित साधू संत आणि निमंत्रित मान्यवरांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.

राम वाद नाही, उपाय आहे
यावेळी पीएम मोदी म्हणाले , राम मंदिराने प्रत्येकासाठी उज्ज्वल भविष्याची प्रेरणा दिलीय. राम वाद नाही, राम उपाय आहे, राम वर्तमान नाही, राम शाश्वत आहेत. राम सर्वव्यापी आहेत. आज अयोध्येत केवळ श्रीरामाच्या मूर्तीचेच अभिषेक झाला नाही, तर श्रीरामाच्या रुपातील भारतीय संस्कृतीवरील अतूट श्रद्धेचाही अभिषेक झाला आहे. हे मानवी मूल्यांचे आणि सर्वोच्च आदर्शांचे मूर्त स्वरुपदेखील आहे.

आज मी प्रभू श्रीराम यांची माफी मागतो. आमच्या परिश्रमात, त्यागात आणि तपश्चर्यामध्ये काहीतरी उणीव राहिली असावी, ज्यामुळे हे काम इतक्या शतकांपासून करू शकलो नाही. पण, आज ती उणीव भरुन निघाली आहे. मला विश्वास आहे की, आज प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील.

रामलला तंबूत राहणार नाहीत
अनेक शतकांच्या प्रतीक्षेनंतर आज आपले रामलला आले आहेत. माझा कंठ दाटून आला आहे, माझे मन अजूनही त्या क्षणात गढून गेला आहे. आमचे रामलला आता तंबूत राहणार नाहीत, आता रामलला दिव्य मंदिरात राहणार आहेत. त्याग आणि तपश्चर्येनंतर आपले राम आले आहेत. हा वियोग फक्त 14 वर्षांचा नाही, तर अयोध्येने शेकडो वर्षांपासून सहन केला आहे. आजपासून हजारो वर्षांनंतरही लोक ही तारीख लक्षात ठेवतील. आमच्यासाठी ही केवळ विजयाचीच नाही, तर नम्रतेचीही संधी आहे. आपला देश पूर्वीपेक्षा खूप सुंदर होणार आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version