Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  क्रिडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य, पुणे आयोजित राज्यस्तरीय शालेय रोड सायकलिंग स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी रजन महाजन याने प्रथम क्रमांक मिळवला. ही स्पर्धा अहमदनगर येथे झाली. रजन महाजन याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
प्राचार्य संदीप पाटील, क्रिडा शिक्षक प्रदीप कासार हे मार्गदर्शक होते. पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी रजन महाजनचे अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version