Spread the love

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा बैलगाडा मालक प्रतिष्ठान संचालक पदासाठी गणेश किसन आप्पा यादव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे बैलगाडा मालक व शौकिन वर्गामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

युवकांमध्ये लोकप्रिय असलेले व सामाजिक कार्यात नेहमी पुढाकार घेणारे श्री. यादव यांची निवड झाल्याने बैलगाडा मालकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि पारंपरिक खेळ संवर्धनासाठी नवे दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संचालक पदावर निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. गणेश किसन आप्पा यादव यांच्या बिनविरोध निवडीमुळे संस्थेचे कार्य अधिक प्रभावी व गतीमान होईल,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version