Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – काळभोरनगर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दि.१० ऑगस्टपासून कीर्तन – प्रवचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .

या सप्ताहात प्रत्येक दिवशी नामवंत कीर्तन कारांनी आपल्या सुश्राव्य कीर्तनाने भक्तिमय वातावरण केले होते . या कीर्तन सप्ताहाचा सांगता समारंभ सोहोळा शनिवार दिनांक.१६ ऑगस्ट रोजी गोपाल काला निमित्त काल्याचे कीर्तन ह. भ. प. गणेश महाराज साळुंखे ( कराड ) यांनी केले.
यावेळी विशेष उपस्थिती श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज संस्थान विश्वस्त अँडव्हॉकेट रोहिणी पवार , श्री संत तुकाराम महाराज संस्थान देहू विश्वस्त ह .भ .प माणिक महाराज मोरे – इनामदार , खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष विठ्ठलराव काळभोर ,नंदू साळुंखे ( पत्रकार ) आदी उपस्थित होते.
काल्याची सांगता महाप्रसादाने झाली.याप्रसंगी शेकडो वारकरी भाविक उपस्थितानी हरिकीर्तनाचा आनंद घेतला.

कीर्तन सप्ताहाचे आयोजन शंकर काळभोर अन्नप्रसाद सोमनाथशेठ काळभोर यांनी केले.तर नियोजन, विशाल बाळासाहेब काळभोर, वैशाली काळभोर, अप्पासाहेब बागल , हनुमान भजनी मंडळ आकुर्डी समस्त काळभोर परिवार यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version