Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चॅलेंजर पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी शनाया सोनवणे हिने महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून शाळेचा मान उंचावला आहे. कठोर परिश्रम, जिद्द आणि उत्कृष्ट खेळाच्या बळावर शनायाने ही कामगिरी साध्य केली.

या यशाबद्दल शाळेचे संचालक संदीप काटे यांनी अभिनंदन करताना सांगितले की, “शनायाची ही कामगिरी शाळेसाठी अभिमानास्पद असून इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे.”शाळेच्या कॉर्डिनेटर श्वेता कांत यांनीही शुभेच्छा देत सांगितले की, “क्रीडा क्षेत्रातील सातत्यपूर्ण मेहनत आणि शिस्त हे यशाचे गमक आहे. शनायाने ते सिद्ध केले आहे.”

तसेच शाळेच्या क्रीडाशिक्षिका कार्तिकला
गायकवाड मॅडम यांचे वेळोवेळी मार्गदर्शन शनायाला मिळाले.शाळेच्या सर्व शिक्षकांनी शनायाचे कौतुक करत तिच्या पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version