Spread the love

रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आपल्या पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी परिसरातील साई लक्झरिया सोसायटीने पर्यावरणपूरक ऊर्जेकडे वाटचाल करत 36 kW क्षमतेचा सोलर पॅनल युनिट यशस्वीरित्या कार्यान्वित केला आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सोसायटीत उपस्थित राहून या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

आजच्या काळात वाढत्या विजेच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर सौर ऊर्जेसारख्या अक्षय्य ऊर्जेचा वापर करणे ही काळाची गरज आहे. साई लक्झरिया सोसायटीने उचललेले हे पाऊल इतरांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. स्वच्छ, शाश्वत आणि पर्यावरणपूरक ऊर्जेकडे जाण्याचा हा निर्णय निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी व्यक्त केले.

यावेळी सोसायटीचे माजी नगरसेविका सविता खुळे, चेअरमन सुनील शिंदे, सचिव संदीप क्षत्रिय, खजिनदार पंकज जयदा, देविदास तांबे, गणेश नखाते, स्वप्न संकुल
चेअरमन अविनाश मेश्राम, सचिव जयदीप पाटील,कमिटी मेंबर सुदीप आंबेकर,विनोद पाटील,व्यवस्थापक संदीप क्षिरसागर,सिद्धिविनायक विंड चाईम चेअरमन प्रवीण मंत्री
शिवधाम सोसायटी रहिवाशी रोमन वाटकर,
लक्ष्मी भक्ती चेअरमन उमेश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व रहिवासी आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version