Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त,पिंपरी-चिंचवड शहरात २५ ठिकाणी भव्य महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे नेतृत्व भाजप शहर जिल्हाध्यक्ष  शत्रुघ्न काटे करत असून,त्यांनी शहरातील नागरिकांना आणि युवकांना या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग देण्याचे आवाहन केले आहे.

आकुर्डी, निगडी,दिघी,इंद्रायणीनगर,नेहरू नगर,कासारवाडी,चिखली,मोशी, तळवडे,फुगेवाडी,चिंचवड,रावेत, सांगवी,पिंपळे गुरव,पिंपळे सौदागर, रहाटणी,वाकड,थेरगाव, काळेवाडी आदी परिसरातील विविध ठिकाणी हे      २२ जुलै २०२५ रोजीरक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.भोसरी, पिंपरी,चिंचवड या तिन्ही विधानसभा संघातील भारतीय जनता पार्टी मंडल अध्यक्ष,विविध पदाधिकारी तसेच अन्य सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पडणार आहे.

“रक्तदान हीच खरी समाजसेवा असून,मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समाजाभिमुख कार्याला मानवंदना म्हणून आपण सर्वांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे, आणि प्रत्येक रक्तदाता ही प्रेरणा आहे!” असे आवाहन श्री.शत्रुघ्न काटे यांनी पिंपरी चिंचवड शहर वासियांना केले आहे.

या शिबिरासाठी चाकण रक्तपेढी संस्थांचे वैद्यकीय पथक उपलब्ध राहणार असून, सर्व उपाययोजना आणि सुविधा शिबिरस्थळी करण्यात आल्या आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version