Spread the love

 

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे आळंदी रस्त्यावरील वडमुखवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने भक्तिभावपूर्ण वातावरणात श्री पांडुरंग आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींची महापूजा हरिनाम गजरात झाली. धार्मिक प्रथा परंपरांचे पालन करीत पूजेचे आयोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज पादुका ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.

महापूजा, अभिषेक आणि हरिपाठाचे आयोजन ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲड. विष्णू तापकीर, सुनीता तापकीर, ॲड. मयूर तापकीर, कीर्ती तापकीर, तापकीर परिवाराने पारंपरिक विधी आणि भक्तिभाव जपत श्रींची महापूजा केली. श्री विठ्ठल-रुक्मिणी आणि माऊलींच्या मूर्तींना दूध, दही, मध, सुगंधी जलाने अभिषेक करण्यात आला. नामगजर, अभिषेक, आरती आणि हरिनामाच्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिरसात न्हाला.

सांस्कृतिक कार्यक्रम आणि कीर्तनसेवा ह.भ.प. गंगाधार स्वामी महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन, हरिपाठ, रात्री हरी जागर भक्तीमय उत्साहात झाला. या प्रसंगी शिवाजी गराडे, मुक्ता गराडे, ह.भ.प. रमेश घोंगडे, राजेंद्र नाणेकर, हर्षल अरबट, शांताराम तापकीर, संतोप पठारे, चंदकांत मोरे आदींसह परिसरातील माऊली भक्तांची उपस्थिती होती. महाप्रसाद आणि आकर्षक सजावट महापूजेनंतर श्रींना महाप्रसादाचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला. मंदिर परिसर फुलांची आकर्षक सजावट, रांगोळ्या आणि दीपसज्जेने विशेष लक्षवेधी सजवण्यात आला होता.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version