Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने क्षेत्रीय कार्यालयांसाठी आरोग्य सोयीसुविधांच्या अनुषंगाने व जागतिक पर्यावरण दिनानिमित्त स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील पहिल्या तिमाहीचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालयाने प्रथम, फ क्षेत्रीय कार्यालयाने द्वितीय, अ क्षेत्रीय कार्यालयाने तृतीय क्रमांक मिळवला आहे. या तिन्ही कार्यालयांचा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील, तृप्ती सांडभोर, नगर सचिव मुकेश कोळप, उप आयुक्त सचिन पवार तसेच सर्व क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उपायुक्त सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात. याशिवाय “माझी वसुंधरा अभियान ६.०”, “स्वच्छ सर्वेक्षण २०२५” अनुषंगानेही नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येते. आरोग्य विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या क्षेत्रीय कार्यालयांचा सन्मान करणासाठी प्रत्येक तिमाहीमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. या स्पर्धेचा पहिल्या तिमाहीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून यामध्ये ड, फ आणि अ या क्षेत्रीय कार्यालयांनी पारितोषिक मिळवले आहे. या क्षेत्रीय कार्यालयांनी आरोग्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्था, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. त्याबद्दल या कार्यालयांचा सन्मान करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात असतात. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी या उपक्रमात जास्तीतजास्त नागरिकांना सहभागी करून घेण्यावर भर देत आहेत. नागरिकांच्या आरोग्याला नेहमीच महापालिकेचे प्राधान्य राहिले आहे.
– शेखर सिंह, आयुक्त तथा प्रशासक, पिंपरी चिंचवड महापालिका

आरोग्या सोयीसुविधांच्या अनुषंगाने आयोजित केलेल्या स्पर्धेच्या पहिल्या तिमाहीमध्ये ड, फ आणि अ या क्षेत्रीय कार्यालयांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे. परंतु या स्पर्धेत सर्वच क्षेत्रीय कार्यालयांनी चांगली कामगिरी केली आहे. क्षेत्रीय कार्यालयांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे.
– सचिन पवार, उपायुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version