Spread the love
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– आज पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरद पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. या भेटीत आगामी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्वाची चर्चा झाली.
यावेळी पक्षासाठी दीर्घकाळ कार्यरत असलेले युवक पदाधिकारी, महिला, विद्यार्थी तसेच इतर सेलमधील एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीत संधी द्यावी अशी मागणी   शरद पवार  यांच्याकडे करण्यात आली.
या भेटीप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रकाश आप्पा मस्के, वृक्षमित्र अरुण पवार, युवक पदाधिकारी रजनीकांत गायकवाड, प्रशांत जाधव आणि उद्योजक तांबे उपस्थित होते.
या वेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “पक्षाच्या वतीने शहरातील सर्व जागा लढविण्यात येणार असून यावेळी नवीन चेहरे उमेदवार म्हणून दिसतील. संघटनेतील एकनिष्ठ पदाधिकारी आणि युवा कार्यकर्त्यांना अधिक संधी दिली जाणार आहे.”ही चर्चा आगामी महापालिका निवडणुकीसाठी पक्षातील नव्या वाटचालीचा संकेत असल्याचे दिसून येते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version