Spread the love

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी येथील केरळ समाजाचे आणि देहूरोड येथील अय्यप्पा मंदिराचे जेष्ठ माजी विश्वस्त बालन नायर यांचे काल निगडी येथे हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मृत्यूसमयी त्याचे वय 85 वर्षें होते.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.

केंद्र सरकारच्या नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी उर्वरित आयुष्य अय्यप्पा मंदिरासाठी सेवाभावी वृत्तीने खर्च केले.

आपल्या प्रेमळ स्वभावामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली होती, त्यांच्या निधनाने केरळ समाजात आणि निगडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.कस्टम विभागाचे अधीक्षक मुरलीधर नायर यांचे ते वडील होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version