Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये चांगलीच जुंपली आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ज्या वस्तादाने तुम्हाला लंगोट बांधायला शिकवले, त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवा. महेश लांडगे यांची भाषा तमाशातील फडासारखी असल्याचा उल्लेख करत उमेश पाटील यांनी सडकून टीका केली आहे. उमेश पाटील पिंपरी- चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

चिखली येथे झालेल्या संत पिठाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार महेश लांडगे यांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना इशारा दिला, “मी पैलवान आहे, अंगावर घ्यायची सवय आहे.” असे अप्रत्यक्षपणे अजित पवारांना सूचित केले होते. यावर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. संत पिठाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात आमदार महेश लांडगे यांची भाषा अत्यंत चुकीची असल्याचं उमेश पाटील यांनी म्हटल आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्या भाषेत बोलायला पाहिजे होतं, ते न करता एखाद्या तमाशाच्या फडाच उद्घाटनात वापरण्यात येणारी भाषा वापरली. महेश लांडगे यांच्या वक्तव्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मान खाली घालायला लावली आहे. महेश लांडगे यांच्या वक्तव्यामुळे महायुतीमध्ये तेढ निर्माण होण्याचं काही कारण नाही. वैयक्तिक पातळीवर जाऊन बोलल्यानंतर याचा पक्षावर काही परिणाम होत नाही.

पिंपरी- चिंचवड शहराचा विकास अजित पवार यांनी केला आहे. विकासाबद्दल त्यांचे मोठे योगदान आहे. ज्या पक्षाने, ज्या व्यक्तीने तुम्हाला मोठं केलं. आमदार केलं, त्याच्याबद्दल कृतज्ञता दाखवली पाहिजे. ज्या वस्तादाने तुम्हाला कुस्ती खेळायला शिकवली. लंगोट बांधायला शिकवली त्याच्यांबद्दल कृतज्ञता दाखवली पाहिजे. असही उमेश पाटील यांनी म्हटलं आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version