Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, यांच्या वतीने १७ ते १९ जून २०२५ या कालावधीत पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सार्वजनिक आरोग्याप्रती असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे यांनी देशभरातून येणाऱ्या हजारो भाविकांना वेळेवर आणि सुलभ आरोग्यसेवा मिळावी यासाठी त्यांच्या वैद्यकीय पथके आणि पायाभूत सुविधांची उभारणी केली.

वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये सुमारे २५०० हून अधिक वारकऱ्यांनी मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला. वैद्यकीय तपासणीमध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, संपूर्ण रक्त गणना, लघवीची तपासणी आणि नियमित निदान यांचा समावेश होता. थकवा, सांधेदुखी, ताप आणि डिहायड्रेशनशी संबंधित समस्या ग्रस्त असलेल्यांना औषधे देण्यात आली

 

कम्युनिटी मेडिसिन विभागाच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आलेल्या या तीन दिवसीय उपक्रमाचा प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि प्रत्यक्ष ठिकाणी वैद्यकीय सहाय्य देणे हा उद्देश होता. या उपक्रमासाठी ३० वैद्यकीय इंटर्न्सना ग्रामीण रुग्णालयात तर १८ इंटर्न्स आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आळंदी, पुणे येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्रात नियुक्त करण्यात आले होते. विशेष कर्तव्य आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतंत्र मोबाइल व्हॅन व रुग्णवाहिकेची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती.

या वैद्यकीय तपासणी शिबिरामध्ये सुमारे २५०० हून अधिक वारकऱ्यांनी मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेतला. वैद्यकीय तपासणीमध्ये रक्तदाब तपासणी, रक्तातील साखरेची तपासणी, संपूर्ण रक्त गणना, लघवीची तपासणी आणि नियमित निदान यांचा समावेश होता. थकवा, सांधेदुखी, ताप आणि डिहायड्रेशनशी संबंधित समस्या यासारख्या सामान्य आजारांनी ग्रस्त असलेल्यांना औषधे देण्यात आली.

या उपक्रमाचे नेतृत्व संस्थेतील प्रमुख शैक्षणिक व वैद्यकीय अधिकारी यांनी केले. यामध्ये डॉ. रेखा अर्कोट (अधिष्ठाता, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे), डॉ. हेतल राठोड (प्राध्यापक व विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसिन विभाग) आणि डॉ. एच. एच. चव्हाण (वैद्यकीय अधीक्षक, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे) यांचा समावेश होता. या समाजाभिमुख उपक्रमाच्या अंमलबजावणीत त्यांच्या टीम्सनी अत्यंत कार्यक्षमतेने व संवेदनशीलतेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या (अभिमत विद्यापीठ)  डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, म्हणाले, “या शिबिरांद्वारे आमचा उद्देश केवळ वैद्यकीय सेवा देणे नव्हे, तर भाविकांप्रती सहानुभूती आणि आधारही पोहोचवण्याचा होता. समाजाची अशा प्रकारे सेवा करणे हे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि हा उपक्रम सार्वजनिक आरोग्य व जनकल्याण प्रती असलेल्या आमच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेचे प्रतिक आहे.”

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे विश्वस्त आणि खजिनदार, डॉ. यशराज पाटील, यांनी सांगितले, “सर्वांसाठी अधिक आरोग्यदायी आणि समतोल भविष्यासाठी कार्य करणे हाच आमचा उद्देश आहे. अशा समाजाभिमुख उपक्रमांद्वारे आम्ही गरजूंना परवडणाऱ्या व सहज उपलब्ध आरोग्यसेवा देण्याच्या आमच्या ध्येयाशी सातत्याने बांधिल राहिलो आहोत.”

डॉ. रेखा अर्कोट, अधिष्ठाता, यांनी सांगितले, “या उपक्रमामुळे केवळ वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय सेवा मिळाली नाही तर आमच्या विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष अनुभवाची अमूल्य संधी मिळाली. अशा समाजाभिमुख उपक्रमांमध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांना करुणा, सेवा आणि पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडील कौशल्यांचे महत्त्व अधिक चांगल्या प्रकारे समजले.”

डॉ. हेतल राठोड, प्राध्यापक व विभागप्रमुख, कम्युनिटी मेडिसिन विभाग, डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे,* यांनी सांगितले, “आमच्या वैद्यकीय टीम्सनी वारकऱ्यांना त्यांच्या प्रवासासाठी वेळेवर वैद्यकीय सेवा मिळेल याची खात्री केली. स्थानिक आरोग्य यंत्रणेसोबत समन्वय साधून आम्ही या गर्दीतही अखंडित सेवा देऊ शकलो.”

या वैद्यकीय शिबिराच्या आयोजनामार्फत *डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर, पिंपरी, पुणे* यांनी पुन्हा एकदा रुग्णालयाच्या सीमा ओलांडून आरोग्य सेवा पुरवण्यात आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. हा उपक्रम केवळ पालखी भाविकांच्या सुरक्षिततेची व आरोग्याची हमी देणारा ठरला नाही, तर वैद्यकीय शिक्षणासोबतच समाजोपयोगी योगदान देण्याच्या संस्थेच्या परंपरेलाही अधिक बळकटी मिळवून देणारा ठरला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version