Spread the love

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भरधाव वेगातील क्रेनने धडक दिल्यामुळे एका वारकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना देहू-आळंदी रोडवर तळवडे येथे बुधवारी (दि.१८) घडली. नारायण गोदवे (वय ५७, रा. आहेरगाव, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्याचे नाव आहे.

अधिकच्या माहितीनुसार, ते देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले.

चिखली पोलिसांनी त्यांना त्वरित वायसीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यांच्याजवळ असलेल्या मोबाइल वरून पोलिसांनी त्यांच्या मुलाशी मुंबई येथे संपर्क साधला आहे. पोलिसांनी आरोपी क्रेन चालक याला ताब्यात घेतल्या असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version