Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – भोसरी विधानसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ घडवत माजी नगरसेवक अजित गव्हाणे यांनी पुन्हा एकदा आपला राजकीय कल बदलला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अजित गव्हाणे यांच्यासह एकूण ३७ माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत (अजित पवार गट) अधिकृत प्रवेश केला आहे.
अजित गव्हाणे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अनेकांच्या विरोधाला न जुमानता त्यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने भोसरी मतदारसंघात सत्ताधारी आमदार महेश लांडगे यांच्याविरोधात निवडणूक लढवली. मात्र, जनतेच्या कौलात त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवानंतरच त्यांच्या पुन्हा अजित पवारांच्या गटात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर ती चर्चा खरी ठरली आणि त्यांनी आपल्या राजकीय कार्यकर्त्यांसह पुन्हा एकदा अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला.
हा पक्षप्रवेश आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. स्थानिक राजकारणात मोठा गट पुन्हा अजित पवारांच्या बाजूने वळल्यामुळे भोसरीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) स्थानिक पातळीवर ताकद वाढणार असून, सत्ताधारी भाजपला येणाऱ्या निवडणुकांमध्ये अधिक टक्कर मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची नावे खालील प्रमाणे..  अजित दामोदर गव्हाणे, राहुल भोसले, डॉ. वैशाली घोडेकर, समीर मासुळकर, गीता मंचरकर, संजय वाबळे, विक्रांतलांडे, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाने, रविंद्रसोनवणे, यश दत्ताकाका साने, विनया तापकीर, अनुराधा गोफणे, सुमन पवळे, संजय नेवाळे, वसंत बोराटे,
भिमाताई फुगे, सारिका लांडगे, हनुमंत अण्णा भोसले,बबनराव बोराटे, विश्वनाथ लांडे, तानाजी खाडे, शशिकिरण गवळी, शुभांगी संजय बोऱ्हाडे, वैशाली संजय उबाळे, स्वाती प्रमोद साने, मंदा उत्तम आल्हाट, शांता आल्हाट,घनश्याम खेडेकर, चंद्रकांत वाळके, जालिंदर शिंदे, विनायक रणसुभे, ईश्वर ठोंबरे, धनंजय भालेकर, निवृत्ती मामा शिंदे, नंदूतात्या शिंदे भरत लांडगे, विकास साने, नितीन सस्ते, संदिप नेवाळे, संजय उदावंत, सम्राट फुग्मर फुगे, विराज लांडे, किशोर गव्हाणे, भरत लांडगे, विकास साने, नितीन सस्ते, संदिप नेवाळे, संजय उदावंत, सम्राट फुगे, अमर फुगे, विराज लांडे, किशोर गव्हाणे, अजित रमेश गव्हाणे, सुनील लांडगे, विशाल आहेर, प्रसाद कोलते, अमृत अप्पा सोनवणे, तुषार फुगे, सुनील पठारे, सागर तापकीर, विपुल तापकीर, संजय तापकीर, दत्तात्रय बुर्डे, विशाल जाधव, निलेश जाधव, राहुल बनकर, युवराज पवार, सागर बोराटे, प्रवीण पिंजण, राहुल येवले,प्रसाद फिरोदिया, राजू खाडे, मंगेश असवले, अनिल तापकीर, अनिल तापकीर, सोमनाथ मोरे, दत्तात्रय जगताप.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version