Spread the love

 

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नांदेड येथील माऊली भक्त भारत रामिनवार, मिरा रामिनवार यांनी श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी १ किलो सोन्याचा सुमारे १ कोटी रुपये किंमतीचा लक्षवेधी आकर्षक, अलंकारिक मुकुट अर्पण केला. यासाठी पुण्यातील प. ना. गाडगीळ आणि सन्स मर्या. यांचे कारागिरांनी चार महिन्यांच्या अथक परिश्रमाने लोकार्पण करण्यात आलेला हा मुकुट तयार केला आहे.

पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. वारकरी परंपरेशी नातं असलेल्या कुशल कारागिरांनी हा मुकुट भक्तिभाव जपत मुकुट विकसित केला. मुकुटावर कमळ, चक्र, सूर्यकिरण आदी मंगल प्रतीके आहेत. हा मुकुट पालखी सोहळ्याचे प्रस्थान पूर्व संध्येला धार्मिक उत्सव प्रसंगी सुपूर्द करण्यात आला आहे. या प्रसंगी देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. “ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी तर्फे दानशूर माऊली भक्तांचा सन्मान करण्यात आला. आळंदी येथे लोकार्पण मुकुट झाला भक्ती, कला व तंत्रज्ञान यांचा संगम असलेला हा मुकुट भाविकांसाठी नक्कीच श्रद्धेचं प्रतीक आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version