Spread the love
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानच्या वतीने आष्टा, तालुका वाळवा येथे येत्या २८ जूनला मराठी-पाली भाषा साहित्य संमेलनाचे आयोजन माजी ग्रामविकास मंत्री आण्णा डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या बैठकीत करण्यात आले आहे.
या एकदिवसीय संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. श्रीपाल सबनीस यांची निवड करण्यात आली असून कार्याध्यक्षपदी   कृषिभूषण सुदाम भोरे आणि उद्घाटक म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासक डॉ. तारा भवाळकर यांची निवड करण्यात आली आहे. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. विठ्ठल वाघ तर ज्येष्ठ विचारवंत  सुनीलकुमार लवटे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले, महेंद्र भारती, प्रभाकर वाघोले, पुरुषोत्तम सदाफुले याप्रसंगी उपस्थित होते.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version