Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  नवी सांगवी पोलीस चौकी चे दुरुस्ती काम तातडीने करा, अशी मागणी  राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे  चिंचवड विधानसभा अध्यक्ष मेघराज लोखंडे यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पावसाळा सुरू झाल्यामुळे ( पिंपळे गुरव डायनासोर गार्डन येथे असलेल्या नवी सांगवी पोलीस चौकी ) समोर भरपूर प्रमाणात पाणीसाठा होत होता त्यामुळे पोलीस चौकीमध्ये तक्रार घेऊन येणाऱ्या नागरिकांना व पोलीस बांधवांना तो त्रास वारंवार सहन करावा लागत होता. त्यानंतर त्रस्त नागरिकांनी मेघराज लोखंडे चिंचवड विधानसभा अध्यक्ष ( राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार ) यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर कामाची पाहणी स्व:ता मेघराज लोखंडे यांनी करत त्या ठिकाणी डासोत्पत्ती होऊन डेंग्यू ,झिका,चिकुनगुन्या व मलेरिया सारखे गंबीर आजार वाढण्याची शक्यता आहे असे मेघराज लोखंडे यांच्या लक्षात आले त्यानंतर त्यांनी मा. सह शहर अभियंता स्थापत्य उद्यान व क्रीडा विभाग ( पिंपरी चिंचवड महानगरपालिका ) येथे निवेदन देऊन सदर काम लवकरात लवकर करावे अशी मागणी केली.

महाराष्ट्र पोलीस हे आपल्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात आपण देखील त्यांची काळजी घेणे आपलं कर्तव्य आहे व नवी सांगवी पोलीस चौकी दुरुस्ती चे काम येत्या २ दिवसात सुरू होईल असे मेघराज लोखंडे यांनी प्रसिद्ध पत्रात म्हटले आहे.यावेळी अवधूत कदम,अथर्व जाधव,जयेश गौरकर आदी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Exit mobile version