Spread the love

खडकी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खडकीतील जुन्या पिढीतील डॉ. पी. एस. आगरवाल यांचे वयाचे ८७ व्या वर्षी निधन झाले. ते गरीबांचे डॉक्टर म्हणून प्रसिद्ध होते. आलेगावकर हायस्कूल खडकी येथील संस्थेत ते संचालक होते.

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, महात्मा गांधी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर त्यांनी वैचारिक लेखन करून ग्रंथ प्रकाशित केले . अनेक चळवळीतून त्यांनी भाग घेतला होता. तसेच ते अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य होते. महात्मा गांधी यांचे रूप घेऊन त्यांनी या शहरात सामाजिक जनजागृती केली होती. आणि इंटिग्रेटेड अभ्यासाचे पुरस्कृत्य होते. तसेच ते लेखक पण होते. त्यांची प्रसिद्ध झालेली पुस्तके –
१. मंथन चिंतन
२. आपले हे असे आहे बुवा
३. यमराज हसला
४. फकीर गुरू
त्यांच्या मागे मुलं, मुली, जावई, नातवंड, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version