Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक होण्याआधीच तो काही दिवसांपासून फरार होता. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी हालचाली अधिक गतीमान केल्या असून, त्याला देशाबाहेर पलायन करण्यापासून रोखण्यासाठी लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. दरम्यान, आता पोलिसांना मोठं यश आलं आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाण याला नेपाळच्या बॉर्डरवरुन अटक केली आहे.

निलेश चव्हाण याला आता पुण्यात आणले जात आहे, मागील काही दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. वैष्णवी हगवणे यांचे बाळ निलेश याच्याकडे दोन दिवस होते. हे बाळ घेण्यासाठी वैष्णवीचे नातेवाईक गेले होते. पण यावेळी निलेशने नातेवाईकांना बंदुक दाखवून धमकावले होते, अशी तक्रार करण्यात आली होती. यानंतर चव्हाण फरार झाला होता. दरम्यान, आता पोलिसांनी त्याला नेपाळच्या बॉर्डरवरुन ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष आठ पथकांची स्थापना केली होती. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला, यामध्ये पुणे, मुंबई, कोकण तसेच कर्नाटक आणि गोवा भागांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक व संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी सुरू केली. दरम्यान, आता यश आले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version