Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या दोन दिवसापासून मुळशी येथील हगवणे कुटुंबाच्या विषयामध्ये संकेत नरेश चोंधे या
व्यक्तीचे नाव समोर येत आहे.मी संकेत सुरेश चोंधे(   I am Sanket Suresh chaundhe ) राहणार विशाल नगर, पिंपळे निलख.माझा या प्रकरणाशी दुरान्वय कोणताही संबंध नाही. नावातील साधर्म्यमुळे समाजातील विविध स्तरातून मला संपर्क होत आहे परंतु या किंवा तत्सम असल्या कोणत्याही प्रकरणातमाझा काहीही संबंध नाही, असा खुलासा संकेत सुरेश चौँधे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
मी भारतीय जनता पक्षाचा एक जबाबदार पदाधिकारी असून मी भारतीय जनता युवा मोर्चा
पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व चिंचवड विधानसभा निवडणूक संयोजक अशा जबाबदारीच्या
पदांवर काम केले आहे. माझे वडील कै. सुरेश ज्ञानोबा चोंधे हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या परिवहन समितीचे अध्यक्ष होते. माझी आई श्रीमती आरती सुरेश चोंधे ही 2012 ते 2022 या कालावधीमध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेची नगरसेविका म्हणून दोन वेळा निवडून आली आहे. त्याचबरोबर मी देखील. माझे कुटुंब अथवा कुटुंबीय यांचे सामाजिकसंबंध पाहता आम्ही अशा कोणत्याही दुष्कृत्यास थारा देत नाही.
Share.
Leave A Reply

Exit mobile version