Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देत शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राज्यस्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेतील दूसऱ्या टप्प्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत राज्यातील २४ कार्यालयांमध्ये तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

राज्य शासनामार्फत प्रशासकीय कामकाजात गतीशिलता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी ‘100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ राबविण्यात आला होता. यामध्ये कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विहित वेळेत सेवा वितरण, ई-ऑफिसची अंमलबजावणी, डिजिटलायझेशन व कागद विरहित कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण, कार्यसंस्कृती सुधारणा अंतर्गत प्रशिक्षण अशा विविध बाबींच्या अनुषंगाने मूल्यमापन करण्यात आले. या बाबींमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी चिंचवड यांनी यांनी उत्तम कामगिरी केली.

या उपक्रमासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी मर्यादित वेळेत विशेष काम करुन हे यश संपादन केल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण यांनी सांगितले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version