Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अखेर पिंपरी -चिंचवड पोलिसांनी सासरे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवनेला स्वारगेट मधून अटक केली आहे. सात दिवसांपासून त्यांचा शोध सुरू होता. या प्रकरणामुळे अवघ राजकारण तापलं होतं. अखेर त्यांच्या पिंपरी- चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

काल दिवसभर राजकीय नेत्यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल अस आश्वासन दिलं होतं. पोलिसांची सहा पथक आरोपींचा शोध घेत होते. अखेर त्यांना स्वारगेटमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी देखील फोन द्वारे कस्पटे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला होता. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अस आश्वासन दिल होत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version