Spread the love

पिंपळे सौदागर,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागरमध्ये परिसरातील नागरिकांसाठी महापालिकेच्यावतीने दवाखाना बांधण्यात आला असून, तो सध्या खूप जुना झाला असून नगरिकासाठी या दवाखान्यातील जागा देखील अपुरी पडत आहे, याच दवाखान्यात नगरिकाना बसण्यासाठी येथे तात्पुरत्या स्वरूपात पत्रा शेडची उभारणी देखील केलेली आहे, तसेच लहान मुलांसाठी या दवाखान्यात लसीकरण देखील असते तेव्हा देखील नागरिकांची गैरसोय होते.

पिंपळे सौदागरमध्ये अनेक कुस्ती,कबड्डी व विविध खेळातील खेळाडू आहेत, त्यांना व्ययाम सराव करण्यासाठी महापालिकेच्या वतीने तालीम व जिम बांधण्यात आलेली आहे या तालमीची देखील वारंवार दुरुस्ती व डागडुजी करण्यात आलेली असून ती सुद्धा जुनी व जीर्ण झालेली आहे, तिचे देखील स्ट्रकचलर ऑडिट करून नवीन बांधण्याची सध्या गरज आहे. 

 प्रभाग क्र २८ रहाटणी पिंपळे सौदागार मधील दवाखाना, तालिम या दोन्ही वस्तु सध्या स्थीतित चालू असून त्या जुन्या व जीर्ण देखील झालेल्या आहेत, ही बाब विचारात घेता या दोन्ही वास्तूचे स्ट्रकचलर ऑडिट करून नवीन आत्याधुनिक सोयी सुविधायुक्त दवाखाना व तालिम बांधण्यात याव्या, असे ही निवेदनात म्हटले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version