Spread the love

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  राष्ट्रीय डेंग्यू दिन – तपासा,स्वच्छ करा आणि भांडी झाकून ठेवा या घोषवाक्याने जनजागृती करीत खेड तालुक्यात उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी दिली.

यानिमित्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई, पुणे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अपर्णा पाटील, खेड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विलास माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक मैदाड, वैद्यकीय अधिकारी डॉ इंदिरा पारखे, तालुका आरोग्य पर्यवेक्षक रेवननाथ ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुष्मान आरोग्य मंदिर राजगुरूनगर अंतर्गत शहरी व ग्रामीण भागातील लोकांमध्ये जनजागृती करीत राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला. यात डास अळी साठी भांड्याची तपासणी तपासणी करण्यात आली. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे, स्वच्छता राखणे, मच्छर दाणीचा वापर करणे,गप्पी मासे पाळा असा संदेश देण्यात आला. ताप आल्यास रक्ताची तपासणी करणे या साठी आरोग्य शिक्षण व जनजागृती उत्साहात झाली. खेड तालुक्यातील विविध ठिकाणी उपक्रम राबविण्यात आला. यात एस,टी स्टँड, आठवडी बाजार आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली. या वेळी आरोग्य निरीक्षक भारती भूषण, दिपक शेलार, महेश दहिवळ यांनी मार्गदर्शन केले. आरोग्य सेवक चंद्रशेखर जाधव, प्रतीक गवारी, दिपक भुसारी यांनी परिश्रम पूर्वक सर्वेक्षण केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version