Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मुक्या जनावराचा मृत्यू झाला. या  मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न पिंपरी गावातील युवा नेते सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे(suhas kudale) यांनी पिंपरी विभाग महाराष्ट्र विद्युत महावितरण कंपनी लि.च्या कार्यकारी अभियंता यांना विचारला आहे. जे दोषी अधिकारी व ठेकेदार असतील यांच्यावर गो हत्याचा गुन्हा ( Crime of cow slaughter)  दाखल का करू नये.? असे ही निवेदनातून म्हंटले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुक्या जनावराचा महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू काल दिनांक १२ मे २०२५. वेळ रात्री ८.३० ते ९ वाजता (अंदाजे वेळ). वळवाच्या पावसामुळे मुके जनावर पावसातून बचाव होण्यासाठी निवारा शोधत होते. त्या मुक्या जनावरांनी वैभवनगर परिसरातील वैभवनगर फेज १ बिल्डिंग मधील बी १ बिल्डिंग शेजारी असलेल्या महावितरणच्या डी .पी .बॉक्सचा आडोसा घेतला. तेथील महावितरणच्या डी .पी (  Mahavitaran’s DP box) बॉक्सचा करंट लागून एका गाईचा नाहक बळी गेला आहे.त्यानंतर महावितरण कंपनीला नागरिकांनी कॉल करून माहिती दिल्यानंतर महावितरण कर्मचारी यांनी येवून येथील वीजपुरवठा बंद करून मृत झालेली गाई बाजूला करून वीज पुरवठा पुन्हा सुरळीत केला. परंतु तेथील रहिवासी पै.चेतन कुदळे व नागरिकांनी मला संपर्क केल्यानंतर मी ताबडतोब तेथे गेलो , तेथे गेल्यानंतर मी प्रत्यक्ष डी .पी .बॉक्सची पाहणी केल्यानंतर डी. पी बॉक्सला करंट लागण्याचे कारणच काय हे आम्हाला समजले नाही. त्यामध्यें केबल शॉर्ट होणे ,आर्थिंग नसणे इत्यादी प्रकारची कारणे असू शकतात का?

मेंटेन्ससाठी लाखो रुपये किमतीची टेंडर काढून सुद्धा पिंपरी परिसरातील कोणतेच डी . पी .बॉक्स सुरक्षित असेल का नसेल यावर खूप मोठी शंखा उपस्थित झालेली आहे.आज मृत झालेली मूक जनावर गाई असेल, परंतु उद्या भविष्यात तेथे सर्वसामान्य नागरिकाचा जीव गेला की महावितरण कंपनी – अधिकारी जागे होणार का? संबंधित घटनेला जबाबदार असणारे इंजिनियर व ठेकदार यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी यासाठी येरवडा येथील विद्युत मंडळाचे सुरक्षा अधिकारी  यांची लवकरच भेट घेणार आहोत.

घटना घडलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होत असल्याचे , बघून मृत गाईला उचलून नेण्यासाठी जी घाई महावितरणनी केली तीच घाई व तत्परता कामामध्ये केली असती तर कदाचित आज चित्र वेगळे असते. तसेच पिंपरी विभाग महावितरण कंपनी यांच्याकडून पिंपरी परिसरातील डी .पी. बॉक्सच्या मेंटेन्ससाठी किती मुदतीआधी – किती कालावधी साठी ठेकेदारास मेंटेनन्सचे काम दिले होते ,किती डी. पी .बॉक्सचे मेंटेनन्स केले आहे व अंदाजे किती रुपये किमतीचे काम होते, तसेच घडलेल्या दुर्घटने बाबत योग्य ते लेखी उत्तर मला मिळावी अशी तसेच जे दोषी अधिकारी व ठेकेदार असतील यांच्यावर गो हत्याचा गुन्हा दाखल का करू नये.? अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुहास सुनंदा साहेबराव कुदळे यांनी महावितरण पिंपरी विभाग कार्यकारी अभियंता यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version