Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पारंपरिक शिक्षणाला आधुनिकतेची जोड देत पिंपरी चिंचवड महापालिका गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवत आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत महापालिका अत्यंत सकारात्मक पाऊले टाकत असून शहराच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी करत आहे ही अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. १८, चिंचवड येथील केशवनगर शाळेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसदस्य सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, नामदेव ढाके, संतोष कांबळे, अभिषेक बारणे, मोरेश्वर शेडगे, विठ्ठल भोईर, बिभीषण चौधरी, माजी नगरसदस्या आश्विनी चिंचवडे, मोना कुलकर्णी, शहर अभियंता मकरंद निकम, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, नितीन देशमुख, कार्यकारी अभियंता किरण अंदुरे, दिलीप भोसले, प्रशासन अधिकारी संगिता बांगर, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उप अभियंता राजकुमार सूर्यवंशी, दमयंती पवार, सामाजिक कार्यकर्ते गतिराम भोईर, रविंद्र देशपांडे, माधव पाटील, शेखर चिंचवडे, शैलेंद्र गावडे, रविंद्र प्रभुणे, दिपाली कलापुरे, चैताली भोईर, गणेश ढोरे, सनी बारणे, अँड. हर्षल नढे, मधुकर बच्चे तसेच शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.

केशवनगर शाळेच्या नव्या पाच मजली इमारतीच्या बांधकामासाठी येणाऱ्या अंदाजे २६ कोटी रुपये खर्चास महापालिकेने प्रशासकीय मान्यता दिली असून, इमारतीचे काम पुढील १८ महिन्यांत पूर्ण होणार आहे. या शाळेतील एकाच सत्रात सुमारे ११५० विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होणार आहे.

चौकट – प्रत्येक मजल्यावरील सुविधा

• पहिला मजला : मुख्याध्यापक कार्यालय, स्टाफरूम, प्रयोगशाळा, वाचनालय, अ‍ॅक्टिव्हिटी रूम, ग्रंथालय, ३ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह

• दुसरा मजला : संगणक कक्ष, स्टोअर रूम, मेडिकल रूम, ६ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह

• तिसरा मजला : मुख्याध्यापक कार्यालय, स्टाफरूम, प्रयोगशाळा, वाचनालय, अ‍ॅक्टिव्हिटी रूम, ग्रंथालय, ३ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह

• चौथा मजला : संगणक रूम, स्टोअर, कन्सल्टेशन रूम, ६ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह

• पाचवा मजला : बहुउद्देशीय हॉल, भाषा कक्ष, पॅंट्री, ५ वर्गखोल्या, मुले व मुलींचे स्वतंत्र स्वच्छतागृह

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी राज्य शासनाच्या शंभर दिवसीय उपक्रमात पिंपरी चिंचवड महापालिकेने दुसरा क्रमांक पटकावल्याबद्दल सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन देखील केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version