Spread the love

 

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी गावातील कुदळे कॉलनी क्रमांक 3 मध्ये  ड्रेनेजचे मैला मिश्रित पाणी  रस्त्यावर  येत आहे. त्याच्या वासाने  रोगराई पसरण्याची जास्त भीती नागरिकांना वाटत आहे.रोगराई पसरू नये यासाठी महापालिकेने उपाय योजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी  महापलिका प्रशासनाकडे केली आहे.

गेल्या वर्षभरापूर्वी ड्रेनेजची नवीन लाईन टाकून सुद्धा महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना ड्रेनेजची समस्या सोडवण्यास अपयश आले. मैला मिश्रित पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व उग्र वास यामुळे नागरिकांना नाहक त्रास होत आहे.सुहास कुदळे सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी याबाबत वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले. तरी याठिकाणी रोगराई पसरू नये यासाठी महापालिकेने उपाय योजना करावी असेही निवेदनात म्हटले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील १ वर्षभरापूर्वी महापालिका अधिकारी यांच्या मागे लागून – पाठपुरावा करून नवीन लाईन टाकून घेतली होती. परंतु महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना नवीन लाईन टाकून सुद्धा नागरिकांचा त्रास सोडविण्यात खूप मोठे अपयश आहे.यावर कायम स्वरुपी उपयोजना कराव्यात यासाठी लवकरात लवकर आयुक्त  यांची भेट घेणार आहे ,असे सुहास कुदळे यांनी म्हटले आहे.अंदाजे ५० लाख रुपये खर्च करून ड्रेनेजचा प्रश्न जर सुटत नसेल तर नागरिकांना होणाऱ्या रोगराईचा तसेच नाहक त्रासाला कोण जबाबदार कोण ? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते सुहास कुदळे यांनी केला.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version