Spread the love

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ठाकरे मैदान, यमुनानगर येथे शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी एच एस आर पी (हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट) जोडणी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रिअल मेझॉन यांच्या सहकार्यातून संघाच्या सुमारे शंभर सभासदांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेटची जोडणी माफक दरात करून देण्यात आली.

याबाबत रिअल मेझॉनचे विभागीय व्यवस्थापक राज पवार यांनी, केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानुसार एक एप्रिल २०१९ पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट बदलून एच एस आर पी या विशेष प्रकारच्या नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. मात्र बरेच ज्येष्ठ नागरिक हे तंत्रस्नेही नसल्याने आधार ज्येष्ठ नागरिक संघाच्या विनंतीवरून त्यांच्या सदस्यांना एकाच जागी ही सुविधा देण्यात आली, अशी माहिती दिली. आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष भानुदास कदम, सदस्य सुनील शाळिग्राम, श्रीकृष्ण पुरोहित, माणिक माने, कचरू जगदाळे, बाळकृष्ण ठोंबरे यांनी या उपक्रमासाठी परिश्रम घेतले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version