Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शासनाच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्याच्या अनुषंगाने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयात गुरुवारी एआय (AI) संदर्भात प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्ता बुद्धिमत्तेचा (AI) प्रशासकीय कामकाजात अधिक प्रभावी वापर करून सुलभता कशी आणता येईल, या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रशिक्षणात एआयच्या मूलभूत संकल्पना, मशिन लर्निंग, डेटा अ‍ॅनालिटिक्स, एआयचे विविध टूल्स आदी विषयांवर सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मीडिया अँड कम्युनिकेशन विभागातील सहाय्यक प्रा. डॉ. अजित गागरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशासकीय कामकाजात सुलभता आणण्यासाठी एआयचा वापर करून पीएमआरडीएमधील कामकाजात सुलभता कशी आणता येईल, याबाबत डॉ. घागरे यांनी संबंधित कार्यशाळेत मार्गदर्शन केले. या दरम्यान त्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

आकुर्डी कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या या कार्यशाळेत प्रशासन विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता, उप आयुक्त किरणकुमार काकडे, अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी – पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अभियांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता शिवप्रसाद बागडी यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version